ब्रिटन पोलिसांनी उधळून लावला थेरेसा मेंच्या हत्येचा कट


लंडन – ब्रिटनच्या पोलिसांनी ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नायमूर जकारिया रहमान आणि मोहम्मद अकीब इमरान या दोन मुस्लीम कट्टरतावाद्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माध्यमात आलेल्या वृत्तानुसार डाउनिंग स्ट्रीट येथे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइसच्या माध्यमातून या दहशतवाद्यांनी स्फोट करण्याचा कट रचला होता. पंतप्रधान थेरेसांची हत्या करणे हा त्यांचा स्फोट करण्यामागचा उद्देश होता. या दहशतवादी कारवाई प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या दोन्ही आरोपींना गेल्या आठवड्यात पकडण्यात आले होते. त्यांच्यावर दहशती कारवायांचे कट रचण्याचे आरोप आहेत.