साणंद कारखान्यात टाटाची पहिली इलेक्ट्रीक टिगोर तयार


बुधवारी साणंद येथील कारखान्यातून टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रीक टिगोर कार बाहेर पडली असून यावेळी माजी अध्यक्ष रतन टाटा तसेच अध्यक्ष एन. चंद्रशेखरन उपस्थित होते. २०१७ च्या सप्टेंबरमध्ये ईईएसएल कंपनीकडून टाटाना १० हजार इलेक्ट्रीक कार पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे त्यातील पहिला २५० कार चा टप्पा डिसेंबर पर्यंत पुरवायचा आहे. ही कार त्या पहिल्या बॅचमधलीच आहे.

अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यावेळी बोलताना म्हणाले की मिळालेल्या कंत्राटाप्रमाणे आम्ही आमचे उत्पादन सुरू केले असून टाटा मोटर्ससाठी ही महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद बाब आहे. भारतात ई मोबिलिटीसाठी भविेष्य निर्माण करण्याच्या कामी आम्हीही योगदान देत आहोत व याचा आम्हाला अभिमान वाटतो. ग्राहकांनाही आमची ही कार आवडेल अशी आशा आहे. कंपनीचे सीईओ गुंटर बुशचेक म्हणाले केंद्र सरकारने देशात २०३० पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराचे ध्येय ठेवले आहे व त्यादृष्टीने ई मोबिलीटी क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. आम्हीही आमचा सहयोग त्यासाठी देत असून आमच्या वाहनांची फुल रेंज आम्ही सादर करणार आहोत. याचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन समस्या मिटविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

Leave a Comment