सध्या बाजारात पातळ बेझलच्या स्मार्टफोनची चलती असून हे फोन खूपच लोकप्रिय ठरले आहेत. अर्थात आयफोन टेन व मी एमआयएक्स या फोनची बेझललेस अशी जाहिरात केलेली असली तरी त्यांना पातळ काठ आहेच.साऊथ कोरियन स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने जगातला पहिला बेझललेस फोन बाजारात आणण्यासाठी कंबर कसली असून हा फोन कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो २०१८ मध्ये सादर केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सॅमसंगचा बेझललेस स्मार्टफोन येणार
मिळालेल्या माहितीनुसार वर्ल्ड इंटरनॅशनल प्रॉपर्टी ऑफिसकडे सॅमसंगने या फोनसाठी पेटंट दाखल केले आहे. संपूर्ण बेझललेस फोन हे तसे मोठे आव्हान आहे कारण त्यामुळे फोनवर सेंसर, कॅमेरे लावण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. सॅमसंगने यावर उपाय म्हणून मुख्य डिस्प्लेवरच एक असा भाग तयार केला आहे जो टॉप, बॉटम व साईड असा सर्वबाजूंनी १८० अंशात वाकू शकणार आहे. हा कन्सेप्ट फोन असून तो अन्य फोनच्या तुलनेत वेगळाच दिसणारा आहे. याच्या डिझाईनसाठी कर्व्ह ग्लासचा वापर होऊ शकतेा असेही सांगितले जात आहे. नवीन वर्षात हा फोन क्रांतीकारी ठरेल असाही अंदाज व्यकत केला जात आहे.