कधीही न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत दिसणार रणवीर


‘पद्मावती’ चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा अतरंगी अभिनेता रणवीर सिंह आता आपल्याला कधीही न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत दिसणार आहे. बुधवारी संध्याकाळी ट्विटवर करण जोहरने उद्या सकाळी एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. करण नक्की कसली घोषणा करणार आहे याकडेच तेव्हापासून सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने अखेर आज सकाळी ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर ट्विट केला. पोलिसाच्या वेशातील पिळदार मिशा असलेला अतरंगी रणवीर या पोस्टरवर पाहावयास मिळतो. करणचा ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ नंतर हा २०१८मधील दुसरा मोठा चित्रपट असेल.

‘गोलमाल अगेन’ फेम दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्याशी ‘सिम्बा’ या अॅक्शनपटासाठी करणने हातमिळवणी केली आहे. ‘सिम्बा’ पुढच्या वर्षी २८ डिसेंबरला प्रदर्शित होईल. या पोस्टरमध्येही रणवीरचा नेहमीचाच उत्साह दिसतो. ‘संग्राम भालेराव’ म्हणजेच ‘सिम्बा’ची भूमिका या चित्रपटात तो साकारणार आहे.