पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींचा नववा प्रश्न


नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याचा सपाटा सुरुच ठेवला असून गांधींनी आज ‘खेड्यातील जनतेला सापत्न वागणूक का देण्यात येते, असा नववा प्रश्न विचारला आहे. गुजरात मधील शेतकऱ्यांना पिकाला हमीभाव, कर्जमाफीचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. पण तेथील शेतकऱ्यांना आजपर्यंत ना कर्जमाफी मिळाली, ना शेतपिकाला हमीभाव मिळाला. तसेच पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.


शेती व्यवसाय या गब्बर सिंगने (जीएसटी) संपविला असून अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. मग शेतकऱ्यांना अशी सापत्न वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.