आशियातील सर्वात ‘मादक’ महिला प्रियंका चोप्रा


आपली आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ब्रिटनची आशियातील सर्वात ‘मादक’ महिला ठरली आहे.

क्वांटिको क्विन प्रियंका चोप्रा लंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ‘५० सेक्सिेस्ट एशियन वुमन’ या स्पर्धेमध्ये पहिली आहे. तब्बल पाचव्यांदा हा किताब प्रियंकाने पटकावला आहे. २०१६ला हा किताब अभिनेत्री दीपिका पादुकोणने पटकावला होता.

प्रियंकाने या ऑनलाइन निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व लोकांचे आभारही मानले आहेत. ती म्हणाली की, याचे श्रेय मी घेऊच शकत नाही. याचे श्रेय तुम्हालाच जाते. याबद्दल मी आभारी आहे आणि हा किताब पुढेही राखून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. प्रियंका चोप्राची ईस्टर्न आयचे एंटरटेनमेंट संपादक आणि या स्पर्धेचे संस्थापक असजाद नजीर यांनीही प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, प्रियंका अतिशय सुंदर, हुशार, शूर आणि चांगल्या मनाची महिला आहे.

या स्पर्धेत दुसरे स्थान भारतातील छोट्या पडद्यावरील स्टार निया शर्मा हिने पटकावले आहे. दीपिका पादुकोण तिसऱ्या, आलिया भट्ट चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री कतरिना कॅफ सातव्या स्थानी आहे आणि श्रद्धा कपूर आठव्या स्थानावर आहे.

Web Title: Priyanka Chopra Asia's most sexy woman