राजकारणापासून लष्कराला दूर ठेवणे आवश्यक – बिपिन रावत


नवी दिल्ली – लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे काल (बुधवार) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कराला राजकारणापासून बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी यावेळी जून्या दिवसांची आठवण काढत, संरक्षण दलामध्ये महिला आणि राजकारण या दोन विषयांवर चर्चा होऊ नये, असा नियम पूर्वी होता. पण या गोष्टींनी काळाच्या ओघात शिरकाव केला असून, आता हे टाळणे आवश्यक असल्याचे मत बोलताना व्यक्त केले.

मुंबईत एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर लष्कराला पादचारी पूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर बरीच टीका झाली. परंतु, पूर अथवा भूकंपासारख्या संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, याचा संरक्षण दलाच्या कामांमध्ये समावेश होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Web Title: Need to keep the army out of politics - Bipin Rawat