मुजीर झारदन २१ व्या शतकात जन्मलेला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर


अफगाणिस्तानच्या मुजीब झारदनने २१ व्या शतकात जन्मलेला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनण्याचा मान मिळविला आहे. ५ डिसेंबरला आयर्लंड विरूद्ध खेळून त्याने ही कामगिरी पार पाडली. या सामन्यात त्याने चार विकेट घेऊन मायदेशाला म्हणजे अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

२८ मार्च २००१ ला जन्मलेला मुजीब अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय टीमचा गोलंदाज आहे. क्वालालंपूर येथे झालेल्या अंडर १९ आशिया कपमध्येही त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाची धूळ चाटविली. अफगाणिस्तानच्या २४८ रन्सला उत्तर देताना पाक संघ ६३ धावात ऑलआऊट झाला तेव्हा मुजीबने ५ विकेट घेतल्या होत्या. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डेब्यू मॅचमध्येही त्याने आयर्लंड विरूद्ध चार विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅचचा मान मिळविला आहे.

आयसीसीचे सदस्य झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळविणार्‍या देशांच्या यादीत अफगाणिस्तान दोन नंबरवर आहे. पहिला क्रमांक ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा असून त्यांनी १८७७ मध्ये आयसीसी सदस्यत्व मिळाल्यानंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळविला होता.