चीनमधील जू कौंटी गावातील एक व्यक्ती एका क्षणात कोट्यधीश झाला आहे. पण तो एवढ्या झटपट कोट्याधीश कसा काय झाला यामागचे सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही केला. त्यावेळी अशी माहिती मिळाली की त्याने एक जंगली डुक्कर पकडले. त्याला मारल्यानंतर त्याचे पोट कापले. त्यावेळी डुक्कराच्या पोटातून एक दगडासारखी वस्तू बाहेर पडली. त्याने ही वस्तू सांभाळून ठेवली आणि ती वस्तू घेऊन तो एक दिवस शांघाईत गेला. त्याला तेव्हा समजले, की ही जगातील सर्वांत महागड्या वस्तूंपैकी एक आहे.
या पठ्ठ्याला रानडुक्कराच्या पोटात असे काय भेटले ज्यामुळे झाला कोट्यधीश
बो चुन्लौला शांघाईच्या एका एक्सपर्टने सांगितले की या ४ इंचाच्या वस्तूची किंमत ४५०,००० पाऊंड म्हणजेच ४ कोटी रुपये आहे. त्याला हे ऐकल्यावर विश्वासच बसला नाही आणि त्याने ही वस्तू विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो लगेच कोट्यधीश झाला.
याबाबत एका विशेषज्ञाने सांगितले की डुक्कर किंवा अनेक जनावरांच्या आतड्यांच्या आत बेझोर (bezoar)तयार होते. अनेक औषधे आणि विषावर उतारा करणारे इंजेक्शन याच्या मदतीने तयार केले जातात. ही वस्तू अत्यंत दुर्मिळ असल्याने महाग आहे.