नाना-राज वादावर मकरंद अनासपुरे यांची सावध प्रतिक्रिया


‘छे…छे, प्रतिक्रिया देऊन मी कशाला ‘चोमडेपणा’ करु आता…
अलिकडेच फेरीवाल्यांबद्दल सहानुभुती दाखवत त्यांच्या पोटापाण्याचा विचार करावा असे विधान अभिनेता नाना पाटेकर यांनी केले होते. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्टेशन बाहेरच्या पुलावर आणि पादचारी मार्गावर बसणाऱ्या फोरीवाल्यांना हाकलून लावण्याची भाषा करीत, नानाच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला होता.

नाम फाऊंडेशनमध्ये नाना पाटेकर यांचा सहकारी असलेल्या मकरंद अनासपुरे याला याच पार्श्वभूमीवर नाना आणि राज ठाकरे यांच्या वादाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मकरंद अनासपुरे म्हणाले, छे छे मी प्रतिक्रिया देऊन कशाला चोमडेपणा करु आता. आपण राज ठाकरे यांचे पुढचे टार्गेट होऊ नये याची पूर्ण काळजी मकरंदने घेत या वादापासून स्वतःला लांबच ठेवले आहे.