पॉन्टिंगच्या विक्रमाशी कोहलीची बरोबरी


नवी दिल्ली – जरी भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली असली तरी ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने १-० ने विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या. ऑस्ट्रेलिया संघाने हा पराक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वामध्ये केला होता. ऑक्टोबर २००५ ते जून २००८ मध्ये केला ऑस्ट्रेलियाने हा विक्रम होता.

जेव्हा श्रीलंका संघाने जुलै २०१५ मध्ये भारताचा दौरा केला तेव्हापासून भारतीय संघ कसोटी मालिकेत अपराजित राहिला आहे. भारताने या काळात ३ वेळा श्रीलंका संघाला तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्टइंडिज, इंग्लंड, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रत्येकी एक वेळा हरवले आहे.

कर्णधार विराट कोहलीने भारताच्या या ९ कसोटी मालिकेंच्या विजयात भारताकडून सर्वाधिक धावा ठोकल्या. १० शतकांच्या मदतीने कोहलीने २ हजार ७०७ धावा केल्या आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाने सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या त्याही वेळी रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच यशस्वी फलंदाज ठरला होता. या ९ कसोटी मालिका विजयात त्याने १२ शतकांच्या मदतीने २ हजार ७९० धावा केल्या होत्या.