मोदी तर राम मंदिर कधीच बनवू शकणार नाही – कपिल सिब्बल


नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा राम मंदिर वादावर खळबळजनक विधान करत सर्वांनाच धक्का दिला आहे. सिब्बल म्हणाले, की बोलताना पंतप्रधान मोदी यांनी थोडी सावधानता बाळगायला हवी कारण सुन्नी वक्फ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात मी प्रतिनिधित्व केलेले नाही. भगवान राम यांच्या इच्छेवर राम मंदिर कुठे व केव्हा बनणार, हे अवलंबून आहे. त्यांना जेव्हा हवे असेल तेव्हा ते मंदिर बनवतील. यावर न्यायालयाला निर्णय यायचा आहे.

त्यांनी मोदींवर यावेळी हल्लाबोल करत मोदी तर राम मंदिर कधीच बनवू शकणार नाही. तुम्ही जर असा विचार करत असाल तर हा विचार करणे सोडून द्या. ते तुमच्या इच्छेने कधीच शक्य नाही. त्यांनी यावेळेस भाजप अध्यक्षांवरही निशाणा साधला. भाजप अध्यक्षांनी जर राम मंदिरावर काही विधान केले तर ते आम्ही समजू शकतो. कारण याहून जास्त त्यांच्याकडून काहीच अपेक्षित नाही, असे ते म्हणाले.