दलाई लामांच्या भेटीला जॉन अब्राहम


विविध चित्रपटांमध्ये आपण अनेकदा स्पोर्ट्स बाइक चालवणारा, खलनायकांशी लढताना दिसणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमची एक वेगळी बाजू नुकतीच पाहायला मिळाली. ‘डॅशिंग’ अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या जॉनचा अध्यात्माकडेही कल असल्याचे त्याची इन्स्टाग्राम पोस्ट पाहिल्यावर लक्षात येते.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये जॉन दलाई लामा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे. मी दलाई लामा यांच्या सानिध्यात असल्यामुळे अध्यात्माच्या आणखीन जवळ गेलो असल्याचे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले. जॉनने त्यांच्या चेहऱ्यावर असणारे तेज, सकारात्मक उर्जा आणि एक वेगळीच अनुभूती असल्याचा अनुभव शेअर केला असून त्याचा हा अनोखा अंदाज अनेकांसाठीच नवा होता.


सध्या जॉन त्याच्या आगामी ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त असून अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटातून ‘कॉकटेल’ फेम अभिनेत्री डायना पेन्टीसुद्धा झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना १९९८ मध्ये पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचणीचा प्रसंग पाहता येणार आहे.