उत्तर प्रदेशातील पर्यटन स्थळी तैनात केले जाणार इंग्रजी बोलणारे पोलीस


मथुरा: उत्तर प्रदेशच्या धार्मिक आणि पर्यटन शहरांमध्ये, आता इंग्रजीत बोलणारे पोलीस तैनात केले जाणार आहेत. हे परदेशी पर्यटकांच्या सोयी आणि सुरक्षिततेला लक्षात घेऊन केले जात आहे. अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की परदेशी पर्यटकांना पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करणे सोपे होईल.

सध्या मथुरा येथून याची सुरुवात केली जाणार आहे. देशाच्या विविध भागांतून येणा-या भक्तांसह परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इंग्रजी भाषा बोलणारे व समजणारे पोलीस कर्मचारी तैनात केले जात आहेत. ते परदेशी लोकांच्या गरजा पूर्ण करतील.

पोलीस महासंचालक सुल्खान सिंह यांनी सर्व पोलीस अधीक्षकांना धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर पर्यटन पोलिस दल तैणार करण्याचे आदेश दिले होते. मंदिरे व रेल्वे स्थानकांवर इंग्रजी भाषेतील पोलिस अधिका-यांचे मोबाईल नंबर लिहिलेले होर्डिंग लावले जावे जेणेकरून विदेशी पर्यटकांना फोनद्वारे मदत मिळू शकेल.

Web Title: English-speaking police to be deployed in Uttar Pradesh's tourist spots