डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला बनवली इस्राईलची राजधानी


वॉशिंग्टन – अनेक दशकांपासून असलेल्या अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचे उल्लंघन करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ही घोषणा अरब आणि युरोपीय नेत्यांच्या आवाहन, अमेरिका विरोधी प्रदर्शनांची शक्यता आणि हिंसाचाराचा धोका असूनही केली आहे.

ट्रम्प यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे की, आपण या निर्णयाने शांतता कायम ठेवण्यासाठी अनेक दशकांपासून अयशस्वी ठरलेला दृष्टीकोन संपवत आहोत. व्यक्तीगत पातळीवर ट्रम्प यांनी प्रथमच इस्राईल आणि पॅलेस्टाईन अशा ‘द्विराष्ट्र उपाय’ संकल्पनेला मान्यता दिली आहे. त्यांनी यावेळी दोन्ही पक्ष यावर सहमत असल्याचेही नमुद केले.

अमेरिकेच्या कायद्यानुसार ट्रम्प यांनी अमेरिकी दूतावास तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवण्याबाबत देखील सुचना दिल्या आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.