अंबानीच्या मुलाच्या लग्नपत्रिकेची किंमत ऐकूण उडतील तुमचे फ्युज


मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या एका लग्नपत्रिकेच्या खर्चात सामान्य माणसाचा संपूर्ण विवाह होईल. त्याचबरोबर आयफोन X चे स्वप्न बघणारा या किंमतीत दोन आयफोन विकत घेऊन एक आपल्या मित्राला गिफ्ट देखील करेल. महाराष्ट्र विदर्भ किंवा बुंदेलखंडमधील एखाद्या शेतकऱ्याचे जीवनभराचे कर्ज देखील माफ होऊ शकते. सामान्य माणसाला अशा रकमेसह एक छोटासा व्यवसाय देखील सुरू करता येईल. तर मग तुम्ही अंदाज लावू शकता की आकाशच्या लग्नपत्रिकेची किंमत किती असेल?

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांमधील एक आहेत आणि फोर्ब्सने त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस घोषित केले. अर्थात सर्वात श्रीमंत माणसाचा विवाह देखील त्याच गौरवानिशी आणि त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असाच पार पडणार या काही शंका नाही. आकाश अंबानींची लग्न तारीख माहित नाही, पण इंटरनेटवरील बातम्या त्यानुसार, या वर्षी डिसेंबरमध्ये हा विवाह होऊ शकतो. पण त्यांच्या लग्नपत्रिकेची बातमी सध्या चर्चेत आहे.

आकाश अंबानींच्या लग्नपत्रिकेच्या किंमतीचा दावा माझापेपर करत नाही. आम्ही फक्त सोशल मीडियावर व्हायरल न्यूजबद्दल बोलत आहोत. असे म्हटले जात आहे की, आकाशच्या लग्नासाठी असलेली पत्रिका १.५ लाख रुपयांची आहे. असे देखील ऐकण्यात आले आहे की या पत्रिकेसाठी सोन्याचा वापर केला गेला असून त्यावर उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे. जर असे असेल तर ज्याला ही पत्रिका मिळणार आहे तो स्वत: ला भाग्यवानच समजेल.

Leave a Comment