९ डिसेंबरला विवाहबद्ध होणार विराट-अनुष्का?


मुंबई: येत्या शनिवारी म्हणजेच ९ डिसेंबरला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

या दोघांचा विवाह इटलीमध्ये पार पडणार आहे. हा संपूर्ण विवाह सोहळा ९, १० आणि ११ डिसेंबरला पार पडणार आहे. हिंदू पद्धतीने त्या दोघांचे लग्न होणार असल्याचेही वृत्त आहे. आजच भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना संपला.

येत्या १० डिसेंबरपासून आता श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेतून विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीला विश्रांती अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे दिल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता लग्नासाठीच विराटला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून मुक्त करण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.