Skip links

पुन्हा एकदा अनुभवता येणार ‘ज्युरासिक पार्क’चा थरार


जगभरात ‘ज्युरासिक पार्क’ या चित्रपटाने वाहवाही मिळवली असून या चित्रपटाचा पुढील भाग आता प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. नुकतीच त्याची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.

ज्युरासिक पार्कच्या या सिक्वेलचे नाव ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’असे असून डायनॉसोर आणि त्यांच्या विश्वामध्ये अडकलेली काही लोक हा संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘पळायला तयार रहा..’ असा संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटाचा ८ डिसेंबरला ट्रेलर रसिकांच्या भेटीला येणार आहे.

क्रिस प्रैट ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटामध्ये जेफ गोल्डब्लम, क्रिस प्रैट, ब्राइस डलास हॉवर्ड आणि इयान मैल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जे.ए. बेयोन यांनी ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’हा चित्रपट भारतामध्ये ८ जून २०१८ रोजी रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये २२ जून रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: Jurassic Park thrills again