तुमच्या दारात कार असेल तर विसरावी लागणार घरगुती गॅस सबसिडी


नवी दिल्ली : आता लवकरच गॅस सबसिडीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे त्यांची घरगुती गॅस सिंलेंडरवरची सबसिडी रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक आरटीओंमधून माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.

असे अनेक नागरिक देशात आहेत ज्यांच्याकडे दोन ते तीन कार आहेत आणि ते गॅसची सबसिडी घेतात. येत्या काळात अशा व्यक्तींची माहिती काढून त्यांची सबसिडी बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. आधार क्रमांकाशी घरगुती गॅसची सबसिडी जोडली गेल्याने सरकारी तिजोरीवरचा जवळपास ३० हजार कोटींचा बोजा कमी झाला आहे. पण आता श्रीमंतांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानालाही कात्री लावण्याचा सरकारचा मानस आहे.