एअरलाईन कंपनीची ऑफर; अवकाशात घ्या ‘हनिमून’चा आनंद


सध्याच्या घडीला प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एअरलाइन कंपन्यामध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देऊ करत आहेत. दरम्यान, एक विमान कंपनी आपल्या प्रवाशांना शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर देत आहे. आपण देखील आता या कंपनीबद्दल विचार करत असाल की हे कसे शक्य आहे? तुमच्या मनात देखील असाच विचार सुरु असेल की प्रवाशांना ही ऑफर प्रवासादरम्यान मिळणार आहे की प्रवासानंतर… तर आम्ही सांगतो तुम्हाला की काय आहे या कंपनीची ऑफर….

अमेरिकेची खासगी एअरलाइन्स कंपनी ‘फ्लेमिंगो एअर’ ही आपल्या प्रवाशांना ही ऑफर देत आहे. कंपनीने २०१३ मध्ये माईल हाई क्लबच्या नावाने ही सेवा सुरू केली होती. २० वर्षांपासून हवाई सेवा प्रदान करत असलेल्या या कंपनीच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपला खिसा देखील खाली करावा लागणार आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना सुमारे ४९५ डॉलर भरावे लागणार आहेत. फ्लेमिंगो एअर कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्हिड मॅकडॉनल्ड यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कंपनीने हजारो जोडप्यांना मदत केली आहे.

आता गोष्ट आहे ती कंपनीने दिलेल्या ऑफरची… या खासगी विमानातील आसने काढून त्याजागी एक बेड बनवण्यात आला असून तेथे दोन उश्या देखील देण्यात आल्या आहेत. विमान नियंत्रित करण्यासाठी तेथे हेडफोन असलेला पायलट देखील असणार आहे.

तथापि, या कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवत ब-याच इतर कंपन्यांनी देखील अशा प्रकारची सेवा सुरू केली होती, परंतु हे रोमांसच्या ऐवजी शारीरिक संबंध निर्माण करण्यावर भर दिला गेला होता. २०१६मध्ये दुसरी एक विमान कंपनी फ्लेमिंगोशी स्पर्धा करीत असून ती कंपनी आहे लव्ह क्लाउड आणि ही कंपनी ग्राहकांना अधिक वेगाने आपल्याकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी ठरत आहे. लव्ह क्लाउड कंपनी नवीन जोडप्यांसहित जुन्या जोडप्यांना देखील सेवा देत आहे. एवढेच नव्हे लग्नाचा वाढदिवस आणी विशेष दिवसांसाठी विशेष व्यवस्था देखील केली जाते.