पेटीएम पेमेंटस बँक देशभरात १ लाख एटीएम बँकींग आऊटलेट सुरू करत असून देशभरात पेटीएम बँकींग सेवेचा विस्तार करण्याचा त्यामागे उद्देश आहे. पुढच्या ३ वर्षात या साठी ३ हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.
पेटीएम बँकेची देशात १ हजार एटीएम सुरू होणार
पेटीएम बँकींगच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणू सत्ती म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकाला बँकींग सेवा सुलभतेने देण्याचा हा प्रयत्न आहे. आमची एटीएम घराशेजारच्या दुकानाप्रमाणे उपयुक्त असतील. ही एटीएम म्हणजे आमच्या बँकेची व्यावसायिक प्रतिनिधीच असतील. येथे खाते उघडणे, पैसे भरणे, काढणे अशा सर्व प्रकारच्या बँकींग सेवा मिळणार आहेत. सुरवातीला देशातील कांही मोजक्या शहरात ३ हजार एटीएम सुरू केली जात आहेत. आमच्या १७ कोटी बचत व वॉलेट खातेदारांसाठी पेटीएम बँकींग नवे व्यवसाय मॉडेल उपलब्ध करून देत आहे. देशाच्या कानाकोपर्यात अन्य गर्दीच्या भागापासून दुर्गम स्थानी राहणार्या ५कोटी नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.