लोंबार्गिनीची धाकड एसयूव्ही ऑरस बाजारात दाखल


इटलीच्या नामवंत लोंबार्गिनी कार उत्पादक कंपनीने त्यांची नवी एसयूव्ही ऑरस नावाने बाजारात आणली असून या शब्दाचा अर्थ आहे जंगली बैल अथवा रानरेडा. या हायपरफॉर्मन्स कारची तयारी अनेक दिवस सुरू होती. ही पाच सीटर एसयूव्हीच असली तरी कंपनीने मात्र तिची भलावण एसएसव्ही म्हणजे सुपरस्पोर्ट युटिलिटी व्हेईकल अशी केली आहे.या कारला किल्लीची गरज नाही.

या कारला ४.० लिटरचे ट्वीन टर्बो व्ही ८ इंजिन आठ स्पीड अॅटो ट्रान्समिशन सिस्टीमसह दिले गेले आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ३.६ सेकंदात घेते तर २०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला १२.८ सेकंद लागतात. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०५ किमी. ही एसयूव्ही जगातील सर्वात वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारला कार्बन सिरॅमिक पासून बनविलेले ब्रेक्स, शार्प एलईडी हेडलाईट, २१ स्पीकर्ससह थ्रीडी साऊंड सिस्टीम दिली गेली आहे. पुढच्या वर्षात ही कार बाजारात विक्रीसाठी येईल व तिची किंमत आहे २ लाख डॉलर्स म्हणजे १ कोटी २९ लाख रूपये.
Lombargini launches SUV Auras

Leave a Comment