या तरुणीसोबत क्षणात काय झाले आणि झटक्यात झाली मालामाल


समजा तुम्ही घरी निवांत बसले आहात आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही कोटी रुपये जमा झाले असल्याचा मेसेज अचानक तुमच्या मोबाईलवर आला तर साहजिकच तुम्ही जागेवरून उठून नाचायला लागाल. पण काही क्षणातच तुमच्या मनात भिती निर्माण होईल. प्रश्न पडेल की हे पैसे कुणी टाकले असावेत. काही जण त्याची चौकशी सुद्ध सुरू करतील. पण, पण असा काहीही विचार करण्यात आपला वेळ ऑस्ट्रेलियातील या विद्यार्थिनीने वाया घालवला नाही. कुणाला तिने काहीच सांगितले नाही. ती सरळ मॉल, ब्रँडेड शोरूम आणि बाजारात गेली. मग सुरू झाला तिचा शॉपिंग फेस्टिव्हल. पण जेव्हा यानंतरचे सत्य तिच्या समोर आले, तेव्हा तिची झोपच उडाली.

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात शिकणारी मलेशियन तरुणी क्रिस्टीन ली हिच्या बँक अकाउंटमध्ये अचानक ३० कोटी रुपये जमा झाले होते. हा घोळ बँकेच्या चुकीने झाला होता आणि ती एका झटक्यात मालामाल झाली. यात महत्वाचे म्हणजे, तिने पैशांची चौकशी करण्याचे कष्टच घेतले नाही. ली कित्येक दिवस फक्त आणि फक्त शॉपिंग करत होती. तिने लाख-लाख रुपयांचे शेकडो ब्रँडेड पर्स, परफ्यूम, महागडे गॉगल आणि दागिन्यांसह विविध वस्तूंचे जणू दुकानच मांडले होते. २०१२मध्ये केलेली ही चूक बँकेला ३ वर्षांनंतर २०१५मध्ये लक्षात आली. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा ली हिच्या खात्यात जमा झालेले ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत असे समोर आले.

पोलिसांनी २०१६ मध्ये तिला सिडनी विमानतळावरून अटक केली. तिच्या विरोधात फसवेगिरी करून आर्थिक लाभ घेण्याचा खटला दाखल करण्यात आला. पण तिची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बँकेने काहीही स्पष्टीकरण न देता तिच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेतले आहेत. एवढेच नव्हे, तर आता तिला खर्च केलेली रक्कम परत करावी सुद्धा लागणार नाही.