मनुष्य जगणार 140 वर्षे?


गेल्या एक शतकात माणसांच्या जगण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आजही मनुष्यांची सरासरी कमाल आयुष्यमर्यादा 115 वर्षे एवढी आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलणार असून माणसांचे वय 140 वर्षे होण्याची शक्यता असल्याचा दावा एक नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

इस्राएलमधील बार लान विद्यापीठाच्या कोहेन लॅब ऑफ मॉलिक्यूलर मेकॅनिज्म ऑफ एजिंग या संस्थेतील प्राध्यापक हाइम कोहेन यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी 70 टक्के व्यक्ती संक्रमणाच्या कारणावरून मरत असत. मात्र आता 70 टक्के लोक वृद्धावस्थेमुळे मरतात. वयामुळे पडणाऱ्या परिणामात आपोआप काही बदल आपण घडवू शकलो, तर कमाल आयुष्यमर्यादा वाढविता येऊ शकते.”

कोहेन आणि नऊ अन्य संशोधकांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष दि जर्नल्स ऑफ गेरोंटोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. गेल्या एका शतकात आजारांवरील उपचारांमुळे माणसांची कमाल आयुष्यमर्यादा वाढली आहे. मात्र आजही ती 115 वर्षे एवढी आहे, ती सुद्धा केवळ 10 टक्के लोकांमध्ये आहे, असे या संशोधनात म्हटले आहे.

या संशोधकांनी यीस्ट, किडे, माशा आणि उंदरांवर प्रयोग केले. त्यात त्यांना त्यांची आयुष्यमर्यादा वाढल्याचे आढळले.

Leave a Comment