इस्त्रोची चांद्रयान २ मोहिम तयारी पूर्ण


भारताच्या महत्त्वाकांक्षी लूनर प्रोजेक्ट चांद्रयान दोनची पुढील वर्षात म्हणजे २०१८ सालाच्या पहिल्या तिमाहीत होणारी चंद्रमोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून या मोहिमेनंतर भारत चंद्रमोहिमेत कार्यरत असलेल्या विविध राष्ट्राच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात चंद्रावर उतरण्यासाठी कोणत्याच देशाकडून मोहिम राबविली गेलेली नाही. त्यामुळे ही मोहिम यशस्वी ठरली तर गेल्या चार वर्षात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

इस्त्रोमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ च्या पहिल्या तिमाहीत चांद्रयान दोन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी पाठविले जाणार आहे. यात जीव्हीएसएल एमके टू रॉकेटचा वापर करून स्वदेशी आर्बिटर, लँडर व रोव्हर चंद्राच्या दिशेने पाठविले जाणार आहेत. लँडर च्रंदाच्या पृष्ठभागावर विशिष्ठ ठिकाणी रोव्हर तैनात करेल व रोव्हर चंद्रावरील खनिजे, तेथील भूपृष्ठासंदर्भातली सर्व माहिती गोळा करेल. २०१३ मध्ये चीनने मानवरहित युटो रोव्हर १ महिन्यासाठी चंद्रावर उतरविण्याचा प्रयत्न केला होता.

इस्त्रोने २००८ साली लाँच केलेल्या मिशन चांद्रयान एक पेक्षा ही मोहिम वेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment