कशी ठरतात कार मॉडेल्सची नांवे?


बाजारात हरदिनी कार उत्पादक कंपन्या नवनवीन मॉडेल्स लाँच करत असतात. या मॉडेल्सना त्यांच्या वैशिष्ठपूर्ण फिचर्सबरोबर विविध नांवेही दिली जात असतात. ही नांवे कशी ठरतात हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल. कार मॉडेलना नांवे ठरविताना नक्की कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात हे सांगणे अवघड आहे. कारण अशी नवी नांवे देताना कांही खास निकष आहेत असे दिसत नाही. उदाहरण द्यायचे तर चीनने २०१० मध्ये ट्रम्पची नावाचे मॉडेल सादर केले होते मात्र त्याचा अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी कांही संबंध नव्हता कारण त्यावेळी ट्रम्प हे मुळातच राजकारणात नव्हते.

भारतातील बडे वाहन उत्पादक नाव म्हणजे टाटा. त्यांनी त्यांची इंडिका व इंडिगो ही मॉडेल्स बाजारात आणली तेव्हा ही नांवे स्थानिक बाजारावर आधारित होती. मात्र जेव्हा परदेशात त्यांच्या कार लाँच करायची वेळ आली तेव्हा झेस्ट, बोल्ट, टियागो, हेक्सा अशी जगमान्य नावे निवडली गेली. कारचा वेग प्रतित करणारी नांवेही अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांना दिली आहेत. उदाहरण द्यायचे तर कोब्रा, जग्वार, मसांग, बिटल यांचे देता येईल.

सध्याचा ट्रेंड अल्फान्यूमेरिक नावांचा आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांच्याबरोबर महिंद्राची टीव्हीयू ३००, एक्सयूव्ही ५०० ही त्याची उदाहरणे. आजकाल छोट्या नावांचीही चांगली चलती असून फोर्ड केए, डॅटसन गो ही त्याची उदाहरणे म्हणता येतील. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा डिझायनर एखादी कार डिझाईन करतो, तेव्हा त्याच्या डोक्यात कांही नांवे असतातच. त्यामुळे कांही वेळा कन्सेप्ट कारसाठी वेगळे नाव व प्रत्यक्षात उत्पादन सुरू झाल्यावर त्याच मॉडेलला दुसरे नाव असेही घडते. मार्केटिग करणारे तसेच जाहिरात क्षेत्रातील तज्ञही कारसाठी नांवे सुचवितात. ही नावे ठरविताना ते सर्वसामान्य असेल पण सहज उच्चारता येईल याची काळजी घेतली जाते. कारच्या नावांबाबत कॉपीराईट फार महत्त्वाचा असतो यामुळे दोन कंपन्या त्यांच्या वाहनांसाठी मिळतीजुळती नांवे ठेवू शकत नाहीत.

कारचे नाव ठरविण्याचा अंतिम निर्णय प्रत्यक्षात कंपनीचा सीईओ व बोर्ड सदस्य घेतात असेही सांगितले जाते.

Leave a Comment