काश्मिरींकडून प्रथमच दहशतवाद्यांवर दगडफेक


श्रीनगर: सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून रोजच दगडफेक करणाऱ्या काश्मिरी नागरिकांकडून दहशतवाद्यांवर दगडफेक केल्याची घटना प्रथमंच घडली आहे. या दहशतवाद्यांमध्ये ‘अल कायदा’च्या काश्मीरमधील म्होरक्याचाही समावेश होता.

भर दुपारी २ वाजता त्राल तेथील जम्मू काश्मीर बॅंकेच्या शाखेत ३ बुरखाधारी दहशतवाद्यांनी प्रवेश केला आणि बंदुकीच्या धाकाने बॅंक लुटण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र यावेळी या परिसरातील स्थानिक नागरिकांनी या दहशतवाद्यांवर जोरदार दगडफेक सुरू केली. त्यामुळे भांबावलेल्या दहशतवाद्यांनी काऊंटर वर ठेवलेले ९७ हजार रुपये घेऊन गोळीबार करत पोबारा केला. दहशतवाद्यांवर स्थानिकानी दगफफेक करण्याची ही पहिलीच घटना आहे.

या दहशतवाद्यांमध्ये ‘मोस्ट वॉंटेड’ दहशतवादी आणि ‘अल कायदा’चा काश्मिरमधील प्रमुख झाकीर मुसा याचाही समावेश होता. मुसा पूर्वी ‘हिज्बुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेत होता. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो पोलीस आणि सुरक्षा दलांना हवा आहे