मराठी भाषिकांसाठी गुगलकडून मोठे गिफ्ट


गुगलने मराठी भाषेत काम करणाऱ्या लोकांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. गुगलने आता यूनिकोडचे ४० पेक्षा अधिक फॉन्ट प्रदान केले आहेत. हे फॉन्ट गुगलकडून पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहेत. हे फॉन्ट सहजपणे वापरले जाऊ शकतात त्यामुळे वेळेची देखील बचत होईल.

यापूर्वी नॉन-युनिकोड वापरणा-या ब्लॉगर, शिक्षक किंवा प्रकाशकांना ब-याचदा खूप अडचणींचा सामना करावा लागत असे. कृतिदेवसारख्या फॉन्टमध्ये टाईप केल्यानंतर, रूपांतरित करण्यात खूप अडचण येत होत्या. त्यात वेळ देखील खूप वाया जात होता.

ब-याच फॉन्टसाठी पैसे देखील मोजावे लागत होते. या परिस्थितीत गुगलने हे विनामूल्य युनिकोड फॉन्ट विशेषतः लेखक आणि पत्रकारांना उद्भवणाऱ्या ब-याच समस्यांचे समाधान केले आहे. आपण हे फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी खालील दुवा वापरू शकता
फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा