जीएसटी नंतरच्या पहिल्या बजेटबाबत उत्सुकता


देशात मोदी सरकारने जीएसटी लागू केल्यानंतरचे पहिले बजेट यंदा १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री अरूण जेटली सादर करणार आहेत. या बजेटबाबत देशभरातील अर्थतज्ञांप्रमाणेच सामान्य नागरिकांनाही विशेष उत्सुकता असल्याचे जाणवते आहे. गेल्या वर्षीपासून अर्थसंकल्प दीडशे वर्षांची परंपरा मोडून फेब्रुवारीच्या १ तारखेला सादर करण्याची प्रथा मोदी सरकारने सुरू केली आहे. यंदाचे बजेटही १ फेब्रुवारीलाच सादर केले जाणार आहे.

संसदेच्या दोन्ही सदनांचे संयुक्त सत्र ३० जानेवारी रोजी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने या सत्राची सुरवात होणार आहे.गतवर्षीपासून रेल्वे बजेटही याच अर्थसंकल्पात समाविष्ट केले गेले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारी या काळात होत असल्याचेही जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment