उकळत्या पाण्याची रहस्यमयी नदी


अमेझॉनच्या जंगलात पेरू देशात एक रहस्यमयी नदी असून तिचे रहस्य आजही वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही. २५ मीटर रूंद व ६ मीटर खोलीच्या या नदीचे पाणी चक्क उकळते आहे. या पाण्याचे तापमान ५० ते ९० डिग्रीवर असते व कांही ठिकाणी ते १०० डिग्रीही आहे. या पाण्यापासून चहा बनविणे शकय होते व अर्धा सेकंद जरी हात पाण्यात घातला गेला तर तो चांगलाच भाजतो. अनेक छोटे प्राणी या नदीत पडून मरण पावतात.

शनय तिपिन्स्का म्हणजे शतके जुनी असे या नदीला म्हटले जाते. सूर्याच्या उष्णनेते उकळणारी नदी असेही तिला म्हटले जाते.१९३० पासून या नदीवर वैज्ञानिक संशोधन करत आहेत मात्र या उकळत्या पाण्याचे रहस्य अद्यापीही उलगडलेले नाही. वास्तविक ज्वालामुखीच्या परिसरात नदी असेल तर तिचे पाणी गरम असू शकते. या नदीपासून ज्वालामुखी ४०० मैलांवर आहे त्यामुळे ती शकयताही वैज्ञानिकांनी फेटाळून लावली आहे. २०११ साली सरकारने या नदीला अधिकृत रहस्यमयी नदी म्हणून मान्यता दिली आहे.

भूवैज्ञानिक अँड्रोज रूजो याने लहानपणापासून या नदीच्या कहाण्या घरातील वडीलधार्‍यांच्या तोंडून ऐकल्या होत्या. त्याने ही नदी शोधली. नदीत पडणार्‍या प्राण्यांची काय अवस्था होते हे त्याने स्वतः पाहिले. तो म्हणतो, आपल्या शरीरात जसे रक्त असते तसेच पृथ्वीच्या भेगांमधून गरम पाणी वाहते. हे नैसर्गिक आहे. अर्थात प्राण्यासाठी ते धोकादायक आहे. ही नदी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली जावी असे त्याचे ध्येय आहे. त्याने लिहिलेल बॉयलिंग रिव्हर अॅडव्हेंचर अॅन्ड डिस्कव्हरी इन द अमेझॉन या पुस्तकात या नदीचे संपूर्ण वर्णन केले गेले आहे.

Leave a Comment