मुकेश अंबानींच्या खिशात नसते कॅश अथवा क्रेडीट कार्ड


आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले रिलायन्स साम्राज्याचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा दररोजचा खर्च किती असेल व कांही खरेदी केली तर ते कॅश देत असतील, का क्रेडीट कार्ड वापरत असतील अशी उत्सुकता अनेकांना आहे. मात्र याचे स्पष्ट उत्तर मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमात दिले आहे व त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अंबानी म्हणाले त्यांच्या खिशात कधीच कॅश नसते तसेच ते डेबिट अथवा क्रेडीट कार्डचा वापरही कधीच करत नाहीत. लहानपणापासूनच त्यांना हीच सवय आहे. कधी काही खर्च करायची वेळ आलीच तर त्यांच्याबरोबर एक व्यक्ती असते ती सारा खर्च करते. मुकेश अंबानी यांची संपत्ती ४२.१ अब्ज डॉलर्स आहे.

अंबानी यांच्या उत्तरावर अनेक मजेदार प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यातील एकाने हे म्हणजे परिक्षेत कायम पहिला पण अभ्यासाचे पुस्तक कधीच न उघडलेला विद्यार्थी अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे तर एकाने हे देश चालवितात त्यांना कॅशही काय गरज असाही सवाल केला आहे.