ज्येष्ठ नागरिकांनी तिकीट सबसिडी सोडल्याने रेल्वेचे ४० कोटी वाचले


रेल्वेने गतवर्षीच सुरू केलेल्या गिव्ह अप योजनेला प्रतिसाद देताना ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने रेल्वे तिकीट सबसिडी स्वच्छेने सोडली असून त्यामुळे रेल्वेचे ४० कोटी रूपये वाचले आहेत. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी रेल्वेने वरीष्ठ नागरिकांना पूर्ण सूट व तिकीटाचे पूर्ण पैसे भरावे असे पर्याय दिले होते.यंदा त्यात सबसिडीची अर्धी रक्कम सोडण्याचा पर्याय जोडला गेला आहे.

यंदा २२ जुलै ते २२ आकटोबर २०१७ या काळात २.१६ लाख पुरूष, २.६७ लाख महिला प्रवाशांनी पूर्ण सबसिडी सोडली तर २.५१ लाख पुरूष व २.०५ महिला प्रवाशांनी अर्धी सबसिडी सोडली. सबसिडी सोडणार्‍या एकूण ज्येष्ठ नागरिकांची संख्या ९ लाख ३९ हजारांवर गेली आहे. गतवर्षी याच काळात ४ लाख ६८ हजार जेष्ठांनी सबसिडी सोडली होती. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठांच्या सबसिडीमुळे रेल्वेला १३०० कोटींचा खर्च करावा लागत होता त्यात आता ४० कोटींची बचत झाली आहे.

Leave a Comment