मुंबई : नुकतीच आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या फेरीची सुरूवात झाली असून १३८ विद्यार्थी प्री प्लेसमेंट संधी मिळवण्यात पहिल्या टप्प्यात यशस्वी झाले आहेत. तर सध्या दुसऱ्या टप्प्याच्या मुलाखती सुरू आहेत. मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून आयआयटी प्लेसमेंट फेज २ च्या मुलाखतीनंतर कोट्यवधीच्या ऑफर्स आल्या आहेत.
मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना कोट्यवधीच्या ऑफर्स
सर्वांचेच लक्ष मायक्रोसॉफ्ट उबर पे पल आणि पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या रुब्रिक या कंपन्यांकडे लागले आहे. १.१० लाख अमेरिकी डॉलरची रक्कम यंदाच्या प्लेसमेंटसाठी निश्चित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किती भरगच्च पगाराची नोकरी मिळते याची उत्सुकता आहे.
कॅम्पस प्लेसमेंटसाठी आज १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आयआयटी मुंबईत त्यासाठी जवळपास २२५ कंपन्या दाखल झाल्या आहेत. यात अधिक पसंती दाही कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या शाखेच्या विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी झालेल्या वादानंतर फ्लिपकार्ट यंदा काय ऑफर देते याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.