नवी दिल्ली – २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. त्याचबरोबर भारत २१ व्या शतकात चीनला मागे टाकत प्रगतीच्या शिखरावर असेल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले. ते एका समिटमध्ये बोलत होते.
चीन आणि अमेरिकेला मागे टाकत लवकरच भारत समृद्ध बनेल: मुकेश अंबानी
जेव्हा मी आजपासून तेरा वर्षांपूर्वी, याच मंचावरून बोललो होतो, भारताची अर्थव्यवस्था त्यावेळी ५०० अब्ज डॉलर्सची होती. त्यावेळी मी म्हणालो होतो की, भारताची अर्थव्यवस्था येत्या २० वर्षात ५ लाख कोटी डॉलरवर पोहचेल. २०१४ पूर्वीच मी केलेली भविष्यवाणी सत्यात उतरणार आहे. लक्ष्याच्या अगदीजवळ आपण पोहचलो असल्याचेही ते म्हणाले. जगात सध्या भारत ६ व्या क्रमांकावर असून जीडीपी २.५ लाख डॉलर्सच्या (ट्रिलियन डॉलर्स) घरात आहे. तर आपण येत्या १० वर्षात ७ लाख कोटीं डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकतो का? आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो का? तर हो आपण हे शक्मय करू शकतो, असेही ते म्हणाले.
भारताबाबत अंबानी आशावादी असून ते म्हणाले की, भारत चीन आणि अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात समृद्ध देश होऊ शकतो. एका नवीन भारताला आणि भारताच्या सुरु झालेल्या पुनरुत्थानाला संपूर्ण जग बघते आहे. मला असा विश्वास आहे की, येणारी तीन दशके भारतासाठी निर्णायक ठरतील.