चीनच्या ४२ अॅपपासून चार हात लांबच रहा; संरक्षण मंत्रालयाचा सल्ला


मुंबई : चीनने तयार केलेल्या सुमारे ४२ अॅपपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. चीन या अॅपच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा भारतीय संरक्षण मंत्रालयाला संशय आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत एमआय स्टोर, वीचॅट या अॅपचा समावेश आहे. शाओमीच्या मोबाईलमध्ये एमआय स्टोर हे प्रामुख्याने वापरले जाते. तर वीचॅट हे मॅसजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असून चिनी कंपनीने हे तयार केले आहे. या यादीत शेअरीट आणि ट्रुकॉलरचाही समावेश आहे.

ट्रुकॉलर हे स्वीडन अॅप आहे. पण संरक्षण मंत्रालयाच्या वापरू नका या यादीमध्ये ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलरने लगेचच यावर स्पष्टीकरण देत आपण अशी हेरगिरी करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण सध्यातरी संरक्षण मंत्रालय ट्रू कॉलरसाठी सुद्धा नाही म्हणत आहे.

एकूण ४२ अॅपला संरक्षण मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. यामध्ये वीचॅट, वीआयबो, शेअरीट, ट्रुकॉलर, युसी न्यूज, युसी ब्राउझर यांचा समावेश आहे. यासोबतच एमआय स्टोर, एमआय कम्युनिटी, एमआय व्हिडीओ कॉल शाओमी हे सुद्धा आहे. भारतात सर्वात जास्त वी चॅट, शेअर इट, ट्रू कॉलर, यूसी न्यूज, यूसू ब्राऊजर, एमआय स्टोअर, एमआय कम्युनिटी, एमआय व्हिडिओ कॉल वापरले जातात. तसेच चीता क्लीन मास्टर सुद्धा माहिती चोरत असल्याचा संशय आहे.

संरक्षण मंत्रालयाने ही सर्व अॅप देशवासीयांनी आपापल्या मोबाईल आणि डेस्कटॉप वरुन तातडीने हटवावी अश्या सूचना दिल्या आहेत. भारतात चीनी कंपन्यांनी आणलेले कमी पैशातील स्मार्टफोन हे अशी अनेक अॅप विनामूल्यही उपलब्ध करून देतात.

Leave a Comment