तुमच्या घरी असलेली डीटीएच छत्री सुद्धा आऊटडेटेड होणार


मुंबई : तंत्रज्ञानात विज्ञानामुळे होत असलेल्या प्रगतीमुळे जगात प्रत्येक मिनीटाला काही ना काही प्रयोगशील घडत असते. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानामुळे काहीशी जुनी झालेली गोष्ट लगेच कालबाह्य होते. आता टीव्ही दिसण्यासाठी तुमच्या घरी असलेली डीटीएच छत्री सुद्धा आऊटडेटेड होण्याच्या मार्गावर असून आता डीटीएचच्या जागी मायक्रो अॅंटीना येऊ घातला आहे.

छत किंवा उंच जागा डीटीएच लावण्यासाठी आवश्यक असते. पण जगभरात आता मायक्रो स्ट्रीप अॅंटीनाची चर्चा आहे. स्वदेशी मायक्रो स्ट्रीप अॅंटीनाची निर्मिती भारतातही करण्यात आली आहे. याबाबत प्रसारमाध्यमातून आलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील फतेहगड येथील बाबा बंदा सिंह बहादुर इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्यूनिकेशन विभागाचे असिस्टंट प्रोफेसर जसपाल सिंह यांनी स्वदेशी मायक्रो अॅंटीना तयार केला आहे.

केवळ दोन ते तीन सेंटीमीटर आकाराच्या चिपचा वापर या मायक्रो अॅंटीनात करण्यात आला आहे. तुमच्या घरातील सर्व्हीस बॉक्सला हा चिप असलेला बॉक्स जोडण्यात येईल. त्यामुळे डिशच्या ऐवजी अॅटीना लाऊनही तुम्हाला टीव्ही स्पष्ट दिसेल.

दरम्यान, याबाबत माहिती देताना असिस्टंट प्रोफेसर जसपाल सिंह यांनी सांगितले की, हा अॅंटीना बनविण्यासाठी मला ५ वर्षांचा काळ लागला. प्रोफेसर जसपाल सिंह यांनी दावा केला आहे की, हा अॅंटीना केवळ ग्राहकच नव्हे तर, कंपन्यांनाही फायदेशीर ठरणार आहे. वेळ आणि पैसा दोन्हीची बचत या अॅंटीनामुळे होणार आहे. त्यासाठी केवळ ५० रूपये खर्च येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी चिप प्रिंडेड सर्किट बोर्ड (पीसीबी) वर लावण्यात येईल. या चीपचा आकार केवळ दोन सेंटीमिटर ते तीन सेंटीमिटर एवढा असणार आहे. या अॅंटीनाचा वापर केल्यास टीव्हीचे सिग्नल गुणवत्तेतही वाढ होणार असल्याचा दावा जसपाल सिंह यांनी केला आहे.

Leave a Comment