आता भीम अॅप व यूपीआयच्या माध्यमातून करा रेल्वे तिकीट बुकिंग


नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने आता कॅशलेस ट्रान्झेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी भीम अॅप व यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली असून रेल्वेच्या ग्राहकांना आता ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी बँक कार्डची गरज असणार नाही. तुम्ही यासाठी सरकारचे भीम अॅप व यूपीआयद्वारेही पेमेंट करू शकता. आजपासून ही सुविधा सुरु झाली आहे.

याबाबत रेल्वेने घोषणा केली आहे, की भीम अॅप व यूपीआयच्या माध्यमातून आजपासून केलेले पेमेंट्स स्वीकार केले जातील. कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क यासाठी देण्याची गरज लागणार नाही. त्याचबरोबर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने तिकीट काउंटरबरोबरच पीओएस मशीन्स जोडली आहेत. डेबिट व क्रेडिट कार्डने त्यामाध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते.

६० टक्केहून अधिक लोक सध्या कॅशलेस तिकीट बुकिंग करतात. ही टक्केवारी ९० पर्यंत आणण्याचे भारतीय रेल्वेचे लक्ष्य आहे. दरम्यान, अनारक्षित तिकीट खरेदी करण्यासाठी ही सुविधा काही महिन्यानंतर लागू केली जाईल. भीम अॅप सरकारने निर्माण केले आहे. यामार्फत अन्य आर्थिक व्यवहारही केले जाऊ शकतात.

Leave a Comment