सुनील शेट्टी भारताचा दुसरा ‘ अंबानी ‘


बॉलीवूडच्या चित्रसृष्टीत अनके ‘अॅक्शन हिरो’ आले, पण या सर्वांमध्ये अभिनेता सुनील शेट्टी याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीला ‘अॅक्शन हिरो’ म्हणून चित्रपटामध्ये प्रसिद्धी मिळालेल्या सुनिलेने ‘हेरा-फेरी‘, ‘ये तेरा घर ये मेरा घर‘ या हिट चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकाही केल्या. त्याने केलेल्या या भूमिका प्रेक्षकांना पसंतही पडल्या. आताशा सुनील चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी १९९०च्या दशकामध्ये सुनीलने अनेक हिट चित्रपट केले. सुनील शेट्टी एक यशस्वी अभिनेता तर आहेः, पण त्याशिवाय एक अतिशय यशस्वी बिझनेसमन देखील आहे. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत त्याने अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांना कधीच मागे टाकले आहे. सुनीलच्या व्यवसायातून त्याला होणारी आर्थिक मिळकत कित्येक हजार कोटींच्या घरात आहे.

सुनीलच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आजवर सुमारे ११० चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. या पैकी हेराफेरी, फिर हेराफेरी, धडकन, गोपी किशन या चित्रपटांतील त्याच्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय झाल्या. आता चित्रसृष्टीतून बाजूला होऊन सुनीलने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. या मधून त्याची मिळकत सुमारे एक अरब रुपये आहे.

सुनीलचे मुंबईतील पॉश वसाहतीत H2O नावाचे आलिशान रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट अतिशय लोकप्रिय असून, इथल्या बारमध्ये मिळणारा ‘लॉन्ग आयलंड टी’ येथील खासियत आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर दक्षिण भारतामध्ये देखील सुनीलच्या मालकीची अनेक रेस्टॉरंट आहेत. सुनीलच्या मालकीचे एक फॅशन बुटिक असून, ते ही अतिशय लोकप्रिय आहे. पॉपकॉर्न एन्टरटेनमेंट नामक प्रोडक्शन हाऊस देखील सुनिलच्याच मालकीचे आहे.

सुनीलच्या जोडीने सुनीलची पत्नी माना ही देखील हा व्यवसायांचा सर्व व्याप सांभाळण्यात मदत करीत असते. माना ‘ आर डेकोर ‘ होम डेकोर स्टोअर मुंबईच्या वरळी भागामध्ये चालविते. पण इतके सर्व व्यवसाय असूनही सुनीलची आर्थिक मिळकत प्रामुख्याने त्याच्या अनेक रेस्टॉरंट्सच्या माध्यमातूनच होत असते.