अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेले डेबिट कार्ड देणार स्टेट बँक


नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नवी सेवा सुरु केली असून जर तुमच्याकडे स्टेट बँकेचे डेबिट कार्ड आहे, पण त्याच्यावर तुमचा फोटो नाही आणि त्यावर फोटो हवा असेल तर त्यासाठी ही नवी सेवा उपयोगी ठरणार आहे.

तुम्हाला डेबिट कार्डवर फोटो लावण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखेमध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेले डेबिट कार्ड प्राप्त करु शकता. तुम्हाला या सुविधेसाठी ठराविक शाखेमध्येच तुम्हाला जावे लागणार आहे. बँकेने यासाठी २५७ शाखेला फिजिटल केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण बँकेच्या या शाखा आहेत. आठवडे किंवा महिन्याभरात होणारे काम या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. तुम्हालाही जर फोटो असलेले डेबिट कार्ड हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला sbiINTOUCH शाखेमध्ये अकाऊंट सुरु करावे लागणार आहे. बँकेने यासाठी देशभरातील १४३ जिल्ह्यातील २५७ शाखेला फिजिटल केले आहे. एसबीआयची सुविधा असलेल्या या शाखा कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या ठिकाणी आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे.

Leave a Comment