स्मार्टफोनच्या जगात अधिराज्य गाजवणाऱ्या अॅपलला सॅमसंगचा तगडा झटका


नवी दिल्ली – अॅपलने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत आयफोनच्या माध्यमातून अव्वल स्थान काबीज केले होते. पण आता सॅमसंगने स्मार्टफोनच्या जगात अधिराज्य गाजवणाऱ्या अॅपलला तगडा झटका दिला असून सॅमसंग सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित अॅपलला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आहे.

ग्लोबल स्मार्टफोन बाजारपेठेतील सध्या सॅमसंगचा हिस्सा २२.३ टक्के एवढा हिस्सा आहे. अॅपलचा या तुलनेत हिस्सा केवळ ११.९ टक्के आहे. जागतिक बाजारपेठेतील अॅपलनंतर हुवाईचा हिस्सा ९.५ टक्के आहे. ही आकडेवारी गार्टनर या संशोधन संस्थेने प्रसिद्ध केली आहे. अॅपल सारख्या बलाढ्य कंपनीला सॅमसंगने मागे टाकल्याने स्मार्टफोन वॉर आता आणखी चुरशीचे होणार आहे.

सॅमसंगचा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित हिस्सा २०.७ टक्के तर अॅपलचा १३.७ टक्के होता. सॅमसंगने बाजारात आणलेल्या गॅलक्सी एस-८, एस-८ प्लस व नोट-८ स्मार्टफोन्समुळे विक्रीत विलक्षणीय वाढ झाली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सना बाजारात चांगली मागणी आहे.

Leave a Comment