२७ जानेवारीला आंगणेवाडीची यात्रा


सावंतवाडी : जानेवारीच्या २७ तारखेपासून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा भरणार आहे. यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. यावर्षीही यात्रोत्सवात १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.

जत्रोत्सवाची तारीख देवीने दिलेल्या आदेशानुसार निश्चित झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे लागून होते. कोकणात जाणा-या गाड्यांचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणा-या यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.

शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment