फेसबुक आता असे करणार तुमचे व्हेरिफिकेशन


सॅन फ्रॅन्सिसको – अकांऊटच्या सुरक्षेसाठी दोन अब्जपेक्षा अधिक यूझर्स असलेल्या फेसबुकने आता पुन्हा नवी योजना आखली असून तुम्हाला आता फेसबुक लवकरच स्वत:चा फोटो अपलोड करायला सांगू शकतो. तुमचा चेहरा फोटोमध्ये स्पष्टपणे दिसणे गरजेचे असून यावरुन फोटो अपलोड करणारा कॉम्प्युटर प्रोग्रॉम नसून मनुष्य असल्याचे ओळखता यावे यासाठी फेसबुक नव्या डिफेन्स सिस्टमचा वापर करू शकतो.

याबाबत एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता नवा कॅप्चा(CAPTCHA) फेसबुक वापरात आणू शकतो. जर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की कॅप्चा म्हणजे काय ? तर अजिबात गोंधळू नका. कॅप्चा म्हणजे एक प्रोग्रॉम असतो फक्त मानव जो वाचू शकतो. याला कॉम्प्युटर प्रोग्रॉम वाचू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर कॅप्चा ही शब्द तपासणारे एक प्रोग्रॉम आहे जी फक्त माणसे वाचू शकतात. माणूस आणि प्रोग्रॉममधील फरक ओळखता यावा, वेबसाईटला व्हायरसच्या हल्ल्याने वाचवता यावे, यासाठी कॅप्चा निर्माण करण्यात आले. या कॅप्चाचा फोटोही फेसबुकने शेअर केला आहे. कॅप्चामध्ये अक्षरांच्या जागी तुम्हाला तुमचा चेहरा स्पष्ट असलेला फोटो अपलोड करायचा आहे. फेसबुकने व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा फोटो सर्व्हरमधून डिलीट करण्यात येणार आहे. व्हेरिफिकेशन पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लॉगईन करता येणार नाही.

या संकेतस्थळाला माहिती फेसबुकने देताना सांगितले की, फोटो चाचणीचा हेतू संशयास्पद गतिविधींना हेरून त्यांना रोखणे आहे. या नव्या डिफेन्स सिस्टमचा वापर अनेकदा मॉलवेअर, व्हायरस, वेबसाईट हॅक होणे, या धोक्यांना रोखण्यासाठी करण्यात येऊ शकतो, अशी माहिती फेसबुकने दिली आहे.

Leave a Comment