तुम्हाला इंटरनेट कनेक्शन हवे आहे? तर दाखवा आधार कार्ड


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला तुमच्या दैनंदिन जीवनात इंटरनेट विना तुमचे पान देखील हालत नाही. पण आता तुम्हाला इंटरनेट कनेक्शन हवे असेल आणि अद्यापपर्यंत तुम्ही आधार कार्ड बनवले नसेल, तर हातातली सर्व कामे बाजूला ठेऊन आधी आधार कार्डचे काम उरकून घ्या. कारण आता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी देखील आधार कार्ड असणे अनिवार्य असणार आहे. आता ग्राहकांकडून त्यांच्या आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच इंटरनेटची सेवा देशात इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आता आपल्या सेवा पुरवण्यापूर्वी इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेन्टिटी नंबरचा तपशील मागणार असल्यामुळे आधार क्रमांकाविना आता कोणत्याही ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन आणि संबंधित अन्य सेवा मिळणार नाहीत.

Leave a Comment