आस्ट्रेलियाचा हा मुलगा आहे जगातील सर्वात लहान उद्योजक


हैद्राबाद : आस्ट्रेलियाचा हा मुलगा जगातील सर्वात लहान उद्योजक असून या मुलाचे नाव हेमिश फिनलेसन असे असून तो फक्त १३ वर्षांचा आहे. हा मुलगा अलिकडेच हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी जगभरातून आलेल्या उद्योजकात आकर्षणाचा विषय ठरला.

आतापर्यंत पाच अॅप्लिकेशन सातवीत शिकणाऱ्या हेमिशने विकसित केले आहेत. तसेच त्याने कासवांना वाचवण्यासाठी एक अॅपही तयार केले आहे. ही सर्व अॅप्लिकेशन्स पर्यावरणावर आधारीत आहेत. आता त्यानंतर तो आरोग्यविषयक अॅप तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याला हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी त्याच्या या कामगिरीमुळे आमंत्रित करण्यात आले होते.

तो आठ वर्षांचा असल्यापासून अॅप तयार करत आहे. हेमिशने काही वर्षांपूर्वी अॅप तयार करण्याच्या एका स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचा या स्पर्धेनंतर या विषयात रस अधिकाधिक वाढत गेला. अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरमध्येही लहानग्या हेमिशने तयार केलेले अॅप उपलब्ध आहे.

मला हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी उपस्थिती लावण्याची संधी मिळाली, माझे येथे लहान उद्योजक म्हणून कौतुक होत असल्याचा मला आनंद आहे. मी सर्वात लहान उद्योजक म्हणून नावारूपाला येत आहे. ही चांगली गोष्ट आहे पण याचबरोबर मी माझ्या अभ्यासावरही माझे लक्ष केंद्रित करतो, असेही तो म्हणाला.

Leave a Comment