या ग्रहावर ७ तासांतच संपते वर्ष


आपल्या पृथ्वीवर १ वर्ष साधारण ३६५ दिवसांचे असते. यात उन्हाळा, हिवाळे. पावसाळा असे ऋतूही असतात. नव्या ग्रहांचा सातत्याने शोध घेण्याचे काम करत असलेल्या केपलर या टेलिस्कोपने पृथ्वीजवळच नवा ग्रह शोधला असून तो पृथ्वीपेक्षा पाचपट मोठा आहे. मात्र नवलाची बाब अशी की या ग्रहावर वर्ष ७ तासांचेच आहे. त्यामुळे हा ग्रह आत्तापर्यंत शोधलेल्या ग्रहातील सर्वात वेगवान ग्रह ठरला आहे.

या ग्रहाची कक्षा भ्रमणाची गती इतकी वेगवान आहे की तो ६.७ तासातच एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. टू पिक २४६३९३४७४ असे या ग्रहाचे नामकरण केले गेले आहे. याचे दुसरे नाव आहे सी १२- ३४७४ बी. केपलरने आत्तापर्यंत २३०० नवीन ग्रहांचा शोध लावला आहे. नव्वाने शेाधल्या गेलेल्या या वेगवान ग्रहावर खडकांचे प्रमाण खूपच असून त्यात लोखंड धातूचे प्रमाण मोठे असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

२०१३ साली केपलर के टू मिशनची सुरवात केली गेली आहे. नव्याने शोधलेल्या ग्रहावर रेडिएशनचे प्रमाण खूप आहे व त्यामुळे तेथील वातावरण खराब असल्याचे निरीक्षणही नोंदविले गेले आहे. डे टू इयर रेशोवरून ग्रहाच्या भ्रमणकाळाची वेळ निश्चित केली जाते. त्यानुसार या ग्रहाचे वर्ष ७ तासांत संपते. या ग्रहावरचा दिवस किती मिनिटांचा असेल याचा अंदाज आत्ताच करता येणार नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment