फ्लोरिडात बनतेय गिटारच्या आकाराचे हॉटेल


हॉलीवूडसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्लोरिडा मध्ये गिटारच्या आकाराचे महाप्रचंड हॉटेल बांधले जात आहे. जगात या प्रकारचे हे एकमेव हॉटेल असल्याचा दावा केला जात आहे. या हॉटेलची उंची ४५० फूट असून ही ३६ मजली इमारत म्हणजे विशाल ग्लास टॉवर आहे. सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल अॅन्ड कॅसिनो या हॉटेलचा विस्तार म्हणून नवे हॉटेल उभारले जात आहे. यासाठी दीड अब्ज डॉलर्स खर्च केले जात आहेत. या विस्तारामुळे सध्याचे हॉटेल दुप्पट आकाराचे होणार आहे.

खर्‍याखुर्‍या गिटारप्रमाणे डिझाईन असलेली ही जगातली पहिलीच इमारत आहे. २०१९ मध्ये ते खुले केले जाणार आहे. यात ६३८ रूम्स व स्यूटस असून एकूण खोल्यांची संख्या आहे १२७०. त्यात रेस्टॉरंटस, लाऊंजेस व ४१ हजार चौ.फूटांचा स्पा, व कॅसिनो आहे.यात ३२६७ स्लॉट मशीन्स, १७८ टेबल गेम्स व १८०० चौ.फूटाची पोकर रूम आहे. येथे येणार्‍या उतारूंसाठी मनोरंजनाच्या भरपूर सुविधा आहेत. १० एकर भागात मनोरंजन पार्क बनविले जात आहे व हेच या हॉटेलचे मुख्य आकर्षण आहे. वॉटर फॉल्स, वॉटर स्पोर्टस यांचीही सुविधा येथे मिळणार आहे.

Leave a Comment