रिलायन्सच्या जिओफोनची बुकिंग प्रक्रिया पुन्हा सुरू!


नवी दिल्ली – आपला ४जी फीचर फोन जिओफोनची बुकिंग प्रक्रिया रिलायन्स रिटेलने पुन्हा सुरू केली आहे. पण याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन खरेदी करण्याची रुची यापूर्वी दाखवलेल्या ग्राहकांनाच हा फोन बुक करता येणार आहे.

अशा ग्राहकांना कंपनीकडून मेसेज करायला सुरूवात झाली असून जुलैमध्ये सुरू झालेल्या पहिल्या बुकींग प्रक्रियेमध्ये ज्यांनी हा फोन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. रिलायन्स जिओकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे, की सुरूवातीला हा फोन ५०० रुपये जमा करून बुक करू शकता. त्यानंतर कंपनीकडून संबंधित ग्राहकांना एक लिंक पाठवली जाईल. ग्राहकांना ५०० रुपये जमा केल्यानंतर फोन कधी उपलब्ध होणार याची माहिती दिली जाईल.

जवळपास एक कोटी लोकांनी जुलैमध्ये जिओफोन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासर्वांना मेसेज पाठवला जाईल. जिओ किंवा रिलायन्स रिटेलने याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. जिओ फोनसाठी ऑगस्टमध्ये सुमारे ६० लाख लोकांनी बुकींग केले होते. जिओफोन फोन मोफत असून यासाठी १५०० रुपये अनामत रक्कम म्हणून कंपनीकडे ठेवायची आहे. त्यासाठी बुकींग करताना ५०० रुपये व फोन मिळाल्यानंतर उर्वरित एक हजार रुपये जमा करायचे आहेत.

Leave a Comment