आता ट्रेनचे लाईव्ह स्टेट्स मिळवा व्हॉट्सअ‍ॅपवर


नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी ट्रेनला होणारा उशीर आणि लागोपाठ प्रवाशांच्या येणा-या तक्रारीमुळे वाढते. ट्रेनला थंडीच्या दिवसात तर धुक्यामुळे होणा-या उशीराचा अंदाजही घेता येत नाही. मग प्रवाशांना ट्रेनला उशीर झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्टेशनवरही गर्दी झाल्याने अडचण होते. पण या समस्येचे निरसन आता रेल्वेकडून केले जाणार आहे.

तुम्हाला गाडीचे लाईव्ह स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर रेल्वे देणार आहे. तुम्ही ज्याद्वारे घरी बसल्या बसल्या गाडीचे लाईव्ह स्टेट्स बघू शकणार आहात. म्हणजे तुम्हाला आता यापुढे गाडीची माहिती विचारण्यासाठी १३९ नंबरवर फोन करण्याची गरज पडणार नाही.

ट्रेनच्या लाईव्ह स्टेट्स जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत एकतर चौकशी कक्षात फोन लावावा लागत होता नाहीतर इंटरनेटवर पीएनआरच्या माध्यमातून माहिती घ्यावी लागत होती. पण अनेकदा वेबसाईट्सवर अपडेटेड माहिती नसते. तुम्हाला अशात आता त्रास करून घेण्याची गरज नाही. कारण तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून तुम्हाला ट्रेनची ताजी माहिती माहिती मिळवता येईल.

तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रेनची ताजी माहिती मिळवण्यासाठी केवळ ट्रेनचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही वेळातच ट्रेनशी निगडीत माहिती तुम्हाला मिळेल. 7349389104 हा नंबर तुम्हाला तुमच्या फोनवरून सेव्ह करावा लागेल. हा नंबर तुम्ही त्या नावाने सेव्ह करावा लागेल, जेथून ट्रेन निघणार असेल. त्यानंतर या नंबरवर कोणत्याही ट्रेनचा नंबर पाठवून माहिती मिळवू शकता.

Leave a Comment