सावधान ! एलआयसी ‘आधार’शी लिंक करण्याच्या नावाने होत आहे फसवणूक

मोबाइल नंबर आणि बँक खाती जोडण्याव्यतिरिक्त, आता इन्शुरन्स पॉलिसीला आधार कार्डशी जोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत त्यासाठी देण्यात आली आहे. परंतु या अत्यावश्यकपणाच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी फसवणूक सुरु केली आहे. या संदर्भात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ने आपल्या वेबसाइटवर याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की एलआयसी पॉलिसीला आधार लिंक करण्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर अश्याच एका फसवणूकीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यात असे सांगण्यात आले आहे की सोशल मिडियावर एलआयसीच्या नावाखाली एक संदेश शेअर केला जात आहे. यामध्ये पॉलिसी धारकांना त्यांच्या पॉलिसीला आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितले जात आहे. यासाठी या पोस्टामध्ये विमा पॉलिसीला लिंक करण्यासाठी एका क्रमांकावर एसएमएस करण्यास सांगितला जात आहे. कंपनीने आपल्या नोटिशीत असे देखील म्हटले आहे की कंपनीकडून अशा प्रकारचा कुठलाही संदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की संदेशाद्वारे इन्शुरन्स पॉलिसीशी आधार जोडण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारचा एखादा संदेश मिळाला असेल ज्यामध्ये आपल्याला एका नंबरवर एक एसएमएस पाठवून इन्शुरन्स पॉलिसीला आधार्शी लिंक करण्यास सांगितले असेल तर असे कधीही करू नका. असे देखील होऊ शकते की एखाद्याने आपली संवेदनशील माहिती चोरून आपल्या माहितीच्या आधारे फसवणूक केली जाऊ शकते.

एलआयसीने म्हटले आहे की कंपनी जेव्हा एसएमएसद्वारे विमा पॉलिसीला जोडण्याच्या सुविधेची सुरुवात करेल तेव्हा ही माहिती वेबसाइटवर दिली जाईल. या क्षणी, एलआयसी पॉलिसीला आधारशी लिंक करण्यासाठी आपण याबद्दल कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इन्शुरन्सची सर्व माहिती एलआयसी पॉलिसीची सर्व माहिती सोबत ठेवा.

पूर्ण तपशील प्रविष्ट केल्यानंतर, आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. आपण शेअर केल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करावा आणि एकदा आपली नोंदणी झाल्यानंतर, आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारशी लिंक झाल्याची माहिती देण्यात येईल.

Leave a Comment