एलबिनेनचे रहिवासी व्हा, ४५ लाख रूपये मिळवा


स्वित्झर्लंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग एकदा तरी पाहावा अशी इच्छा जगभरातील अनेक नागरिकांना असते. आता या स्वर्गातील मेरूमणी म्हणता येईल अशा बर्फाच्छादित पर्वतरांगाने व हिरव्यागार जमिनींनी व्यापलेल्या एलबिनेन या गावात परदेशी नागरिकांना राहण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे. या गावचे निवासी होऊ इच्छीणार्‍या परदेशी नागरिकांना प्रशासन चक्क ४५ लाख रूपये देणार आहे. या संबंधी सोशल मिडीयावर ही ऑफर दिली गेली असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

आल्प्सच्या पर्वतरांगात वसलेल्या या सुंदर गावाची लोकसंख्या अवघी ३०० वर आली आहे. कामाच्या शोधात येथील तरूण पिढी स्थलांतर करून शहरात गेली आहे. येथील लोकसंख्या प्रशासनाला वाढवायची आहे. त्यासाठी परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यात येत आहे. त्या दृष्टीने कायदा बनविण्याचे काम सुरू असून त्यावर स्थानिक कौन्सिल मतदान करणार आहे. त्यानुसार येथे येऊ इच्छीणार्‍या परदेशी नागरिकांना २५ हजार स्विस फ्रँक्स म्हणजे ३५ लाख रूपये दिले जाणार आहेत. येथे येणारे जोडपे मुलासह आले तर त्यांना ४५ लाख रूपये मिळणार आहेत. यामुळे शांत निसर्गरम्य ठिकाणी राहण्याच्या आनंदाबरोबरच कमाईची संधीही उपलब्ध झाली आहे.

Leave a Comment